Shri Shivaji College of Arts, Commerce & Science, Kandhar, Nanded.
Kandhar, Dist: Nanded. 02466223446 ssckandhar108@gmail.com

Bachelor of Arts

Department Of Marathi


मराठी विभाग, श्री शिवाजी कॉलेज कंधार.

मातोश्री मुक्ताई धोंडगे यांच्या प्रेरणेतून भाई डॉक्टर केशवरावजी धोंडगे साहेब यांनी आपल्या सहकाऱ्यांच्या मदतीने इसवी सन 1948 मध्ये शिवजयंतीच्या शुभ मुहूर्तावर श्री शिवाजी मोफत शिक्षण संस्थेची स्थापना केली. या संस्थेच्या माध्यमातून श्री छत्रपती शिवाजी बोर्डिंग व श्री शिवाजी वाचनालय सुरू केले. दिनांक 28 ऑक्टोबर 1958 रोजी सोनखेड येथील श्री शिवाजी मोफत विद्यालयाचे उद्घाटन झाले, ज्यासाठी तत्कालीन मुंबई राज्याचे मुख्यमंत्री नामदार यशवंतरावजी चव्हाण साहेब उपस्थित होते. पुढे जून 1959 मध्ये श्री शिवाजी मोफत कॉलेज सुरू करण्यात आले आणि कॉलेजच्या स्थापनेपासूनच महाविद्यालयात मराठी विभाग कार्यरत आहे. मराठी साहित्य व मराठी लोकसाहित्यात नामवंत असलेले अनेक प्राध्यापक या विभागात कार्यरत राहिले असून, विभागाची यशपरंपरा अतिशय समृद्ध आहे.

Syllabus

Marathi Syllabus (NEP 2020)

Programms & Objectives

मराठी विषयाची उद्दिष्टे:

  • मराठी भाषा साहित्य कला संस्कृतीच्या अनुषंगाने पदवी अभ्यासक्रमाची निर्मिती.
  • मराठी भाषिक विद्यार्थ्यांना व्यवहाराच्या दृष्टीने रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणारा अभ्यासक्रम.
  • मराठी साहित्यात मूलगामी व दिशादर्शक संशोधनात्मक निर्मितीचा अभ्यासक्रम तयार करणे.
  • मराठी भाषेत स्पर्धा परीक्षा व रोजगाराच्या संधी लक्षात घेऊन कौशल्य आधारित अभ्यासक्रमाची निर्मिती.
  • प्राचीन, मध्ययुगीन व आधुनिक मराठी साहित्याचा भाषा व संस्कृतीचा अनुभव समजून घेणे.
  • मराठी साहित्याचा सामाजिक तथा सांस्कृतिक पार्श्वभूमीचा अभ्यास करून विविध संप्रदायाच्या विचारधारा समजून देणे.
  • मराठी वाङ्मयाची स्वरूप परंपरा व इतिहास यांचा परिचय देऊन वाङ्मयाबद्दलची अभिरुची निर्माण करणे.
  • साहित्याच्या भाषेचे स्वरूप अभ्यासून भाषेच्या क्षेत्रातील विविध संधींचा परिचय करून देणे.

मराठी विषयाची उपयुक्तता:

  • मराठी भाषा, साहित्य, कला, संस्कृती ची अभिरुची निर्माण होईल.
  • मराठी भाषेबरोबरच मराठी साहित्याच्या सामाजिक तथा सांस्कृतिक पार्श्वभूमीचा अभ्यास.
  • मराठी भाषेतील साहित्याच्या भाषेची स्वरूप अभ्यासून भाषेच्या क्षेत्रातील विविध संधी, रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणे.
  • भारतीय व पाश्चिमात्य साहित्याचे स्वरूप विशेष लक्षात घेऊन अभिजात मराठी साहित्याची परंपरा समजून घेणे.
  • मराठीच्या प्राचीन, मध्ययुगीन व आधुनिक साहित्याचा भाषा व संस्कृतीचा सहसंबंध अनुभवणे.
  • जागतिक परिप्रेक्षात मराठी साहित्याची सद्यपरिस्थिती जाणून विद्यार्थ्यांना व संशोधकांना रोजगाराच्या विविध संधी निर्माण करून देणे.

Teaching Staff

Sr.No. Photo Staff Information
1 डॉ. दिलीप सावंत

कॅप्टन डॉ. दिलीप साहेबराव सावंत

विभाग प्रमुख

Qualification : एम ए, बी एड, पीएच.डी.
Specialization : मध्ययुगीन मराठी साहित्य
Details : संपादक - आत्मप्रत्येय त्रैमासिक (2008 पासून), राष्ट्रीय छात्र सेना (NCC) कॅप्टन (2003-2023). महात्मा ज्योतिबा फुले यांच्या साहित्यातील लोक आणि लोकतत्त्व या विषयावर पीएचडी. 30 हून अधिक शोधनिबंध विविध मासिकांतून प्रकाशित.
2 प्रा. डॉ. उमेश पुजारी

प्रा. डॉ. उमेश भगवानराव पुजारी

सहयोगी प्राध्यापक

Qualification : एम ए, बी एड, नेट, पी.जी.डी.एफ.सी.एस, डी.टी.ए, सीसीएम, पीएच.डी.
Specialization : लोकसाहित्य व संस्कृती
Details : मुख्य संपादक - रणक्रांती बहुभाषी मासिक (2013 पासून). राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी (2021 पासून). राज्यस्तरीय उत्कृष्ट मराठी अध्यापन व साहित्य सेवा गौरव पुरस्कार 2024. NEP प्रशिक्षक म्हणून विद्यापीठ मान्यता.
3 प्रा. ज्ञानेश्वर गायकवाड

प्रा. ज्ञानेश्वर गायकवाड

सहाय्यक प्राध्यापक (CHB)

Qualification : एम ए, बी एड, सेट.
Specialization : मराठी पद्य वाङ्मय
4 प्रा. ज्ञानेश्वर डाखोरे

प्रा. ज्ञानेश्वर डाखोरे

सहाय्यक प्राध्यापक (CHB)

Qualification : एम ए, बी एड, नेट, सेट, पीएच.डी.
Specialization : मराठी वैचारिक साहित्य
5 प्रा. महादेव मोरे

प्रा. महादेव मोरे

सहाय्यक प्राध्यापक (CHB)

Qualification : एम ए, एम एड, एम फिल, पीएच.डी.
Specialization : मराठी संत साहित्य

Activities

1. मराठी भाषा संवर्धन पंधरवडा: मराठीतील संशोधक प्रा. गजानन इंगोले यांनी विद्यार्थ्यांना भाषा समृद्धी व भाषा विकासाच्या संदर्भात सखोल मार्गदर्शन केले.

2. संपादित ग्रंथ प्रकाशन सोहळा: कॅप्टन डॉ. दिलीप सावंत सर यांनी संपादित केलेल्या लोकशाहीर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे व भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यावर आधारित संशोधन ग्रंथाचे प्रकाशन प्राचार्य डॉ. सूर्यकांत जोगदंड सर यांच्या हस्ते संपन्न झाले.

3. वाचन संकल्प महाराष्ट्राचा: महाराष्ट्र शासन व स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड यांच्या वतीने 7 दिवसीय वाचन प्रेरणा उपक्रम "वाचन संकल्प महाराष्ट्राचा" मोठ्या प्रमाणात साजरा करण्यात आला.

विभागाच्या वतीने राबविण्यात येणारे विविध उपक्रम:

  • मातोश्री मुक्ताई धोंडगे आंतर महाविद्यालय निबंध स्पर्धेचे आयोजन.
  • वार्षिक स्नेहसंमेलनाचे आयोजन.
  • आंतर महाविद्यालयीन युवक महोत्सव, विद्यार्थी निबंध, वादविवाद, वक्तृत्व व इतर स्पर्धांसाठी मार्गदर्शन.
  • राष्ट्रीय सेवा योजना व सांस्कृतिक विभागातील विविध उपक्रमांत सहकार्य.
  • मासिक रणक्रांती व त्रैमासिक आत्मप्रत्येयच्या माध्यमातून मराठी साहित्यातील शोधनिबंधांचे कार्य.
  • जागतिक गुराखी साहित्य संमेलन, शिवजयंती व इतर सांस्कृतिक-सामाजिक कार्यक्रमांत विभागाची महत्त्वपूर्ण भूमिका.
  • कौशल्य विकास आधारित अभ्यासक्रमांतर्गत व्याकरण व स्पर्धात्मक विषयांचे मार्गदर्शन.
  • कथा, कविता, कादंबरी, नाटक, अभिनय, चित्रपट पटकथा लेखन, ब्लॉग लेखन व वर्तमानपत्र मुलाखतीच्या दृष्टीने विद्यार्थ्यांना मार्गदर्शन.

Alumni

मराठी विभागाची यशपरंपरा अत्यंत समृद्ध आहे. विभागातील अनेक प्राध्यापक हे राज्यभर व्याख्याने देणारे विद्वान व तज्ज्ञ असून, त्यांनी भाषा, साहित्य, संस्कृती आणि लोकसाहित्यात मोलाचे योगदान दिले आहे. विभागाचे अनेक विद्यार्थी विविध शाळा, महाविद्यालये आणि शासकीय विभागांमध्ये महत्त्वपूर्ण पदांवर कार्यरत आहेत.

News & Events

मराठी विभागाच्या वतीने मराठी भाषा संवर्धन पंधरवडा साजरा करण्यात आला. त्याप्रसंगी मराठीतील संशोधक प्रा. गजानन इंगोले यांनी भाषा समृद्धी व भाषेच्या विकासासंदर्भात विद्यार्थ्यांना सखोल मार्गदर्शन केले. यावेळी विभाग प्रमुख डॉ. दिलीप सावंत, डॉ. उमेश पुजारी, डॉ. ज्ञानेश्वर डाखोरे, प्रा. महादेव मोरे, प्रा. ज्ञानेश्वर गायकवाड व विद्यार्थी उपस्थित होते.

श्री शिवाजी कॉलेज कंधार येथील मराठी विभागप्रमुख कॅप्टन डॉ. दिलीप सावंत सर यांनी संपादित केलेल्या, लोकशाहीर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे व भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यावर आधारित स्वसंशोधन लेखनाच्या संपादित ग्रंथाचा प्रकाशन सोहळा महाविद्यालयाच्या मातोश्री मुक्ताई सभागृहात प्राचार्य डॉ. सूर्यकांत जोगदंड सर यांच्या हस्ते संपन्न झाला.

महाराष्ट्र शासन, स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड व श्री शिवाजी कॉलेज कंधार मराठी विभागाच्या वतीने महाविद्यालयात सात दिवसीय "वाचन संकल्प महाराष्ट्राचा" हा अभिनव उपक्रम मोठ्या प्रमाणात साजरा करण्यात आला. प्राचार्य डॉ. सूर्यकांत जोगदंड, विभाग प्रमुख डॉ. दिलीप सावंत तसेच इतर प्राध्यापक व विद्यार्थ्यांनी यात सक्रिय सहभाग घेतला.